वाहतूक पोलिसांनी लावलेला जमर लंपास

(श्रीराम कांदु )
कल्याण : भर रस्त्यात बेशिस्त पणे पार्क केलेली गाडीला वाहतूक पोलिसांनी लावलेला जमर घेवून सबंधित वाहनचालकाने धूम ठोकल्याची घटना कल्याणात उघडकीस आली आहे .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून वाहनचालकाचा शोध सुरु केला आहे .
    कल्याण पश्चिम मधील बस डेपो मागील बाजूस असलेल्या गल्लीत काल सायंकाळी  एम एच ०४ एच एफ ६८८६ हि गाडी रोडच्या विरुद्ध दिशेने बेशिस्त ने उभी करण्यात आल्याने वाहतूक पोलिसांनी या गाडीला जमर लावले होते .काही कालावधीने वाहतूक पोलीस त्या ठिकाणी गेले असतांना त्यांना ती गाडी आणि जमर दोन्ही आढळून आले नाही .त्यामुळे सबंधित वाहनचालकाने जमर चोरी केल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात सबंधित वाहन चालक विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
नोकरीचे आमिष दाखवून 3 लाखांना गंडा
कल्याण : नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणालां तब्बल 3 लाखांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे .सचिन सांगळे हे फसवणूक झालेल्या तरुनाचे नाव असून तो मुंबई परेल येथे राहणारा आहे .सांगळे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी कल्याण पश्चिमेकडील उबर्डे येथे राहणाऱ्या ,माणिक गोरे विरोधात गुन्हा दखल केला आहे .
  मुंबई येथे राहणारा सचिन सांगळे यांना माणिक ने तुला सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले होते .२०१५ पासून आजमितीला माणिक ने सांगळे यांच्याकडून नोकरीचे आमिष दाखवत तब्बल 3 लाख रुपये उकळले .मात्र तीन वर्ष उलटूनही नोकरी बाबात काहीच हालचाल ण झाल्याने सांगळे याला पैसे परत मागितले मात्र माणिक ने टाळाटाळ केल्याने त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .त्यामुळे त्याने या प्रकरणी माणिक विरोधात खडकपडा पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दखल करत पुढील सुरु केला आहे .
शेळ्या चोरल्या
कल्याण : कल्याण नजीक असलेल्या मोहने येथे एका बकरीपालन करणाऱ्या एका इसमाच्या दोन शेळ्या कुणी अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून चोरी केल्याची घटना घडली आहे .
   कल्याण नजीक असलेल्या मोहने शिवाजी चौक येथे राहणाऱ्या विष्णू पाटील यांचा बकरी पालनाचा व्यवसाय आहे .काल दुपारी तीन वाज्ण्याच्य्या सुमारास पाटील आपल्या सात शेळ्या घेवून मोहने यादव नगर येथील नदी काठी चरण्यासाठी गेले होते .यावेळी अज्ञात इसमाने त्यांची नजर चुकवून दोन शेळ्या चोरून नेल्या .सदर बाब निदर्शंनस येताच पाटील यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email