वासिंद रेलवे बोगदा पाणी समस्या कायमची मिटवण्यासाठी हायकोर्ट गंभीर..

आयआयटीला उपाययोजनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश..!

मुंबई उच्च न्यायालयाने वासिंद व परिसरातील हजारो ग्रामस्थाना वर्षभर व ऐन पावसाळयात जीवघेणा छळणारा वासिद रेलवे बोगदयातील पाणी समस्येतून कायमची सुटकेसाठी ऐतिहासिक आदेश दिला.राज्य व केंद्र सरकारच्या खर्चातून आयआयटीदवारे कायम उपाययोजनेसाठीचा प्रत्यक्ष अहवाल सादर तातडीने करण्याचे सुचवीले आहे.वासिंद येथील संजय सुरळके यांनी जनहित याचिकेमध्ये नमूद केलेल्या रेलवे उडडाण पूल 1 वर्षात उभारण्याचे सत्यप्रतिज्ञापत्र सरकारने दिले,रेलवे बोगदयातील साचणा-या पाणीसमस्येबाबत मागणी केली होती.मुबई उच्च न्यायालयाने न्या.अभय ओक यांंच्या समितीने वासिंद येथे प्रत्यक्ष येऊन वस्तुस्थिती अहवाल दिला होता.मुबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटिल व न्या.कुलकर्णी यांंनी देखील याच अहवालावरून राज्य व केद्र सरकारला जाब विचारला,आयआयटी या भारतीय प्रादयोगिकी संस्थेला कायम उपाययोजना अहवालासाठी तबब्ल 4 लाख 23 हजार खर्च दयावा लागेल.याचिकाकर्ते संजय सुरळके यांच्या वकील अँड.शकुंतला वाडेकर यांनी हजारो ग्रामस्थाची समस्या प्रभावीपणे मांडली.येत्या 1 महिन्यात आयआयटीचे संशोधक,तंत्रज्ञ वासिंदला अभ्यास अहवाल सादर करतील.दरम्यान,वासिंद व परिसरातील हजारो ग्रामस्थांंना रेलवे उडडाणपूल उपलब्ध होईलच मात्र रेलवे बोगदा कोरडा पाणीरहीत व सुरक्षित मिळणार असल्याने मुबई उच्च न्यायालयातील संजय सुरळके यांंच्या  या जनहित याचिकेमुळे अनेक वर्षाची समस्या दूर होणेसाठी आयआयटी अहवाल लाभदायी ठरेल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email