वासनांध सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म
डोंबिवली दि.१९ – वासनांध सावत्र बापाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना कल्याण पूर्वेत उघडकीस आली आहे. या प्रकरणी वासनांध बापा विरोधात कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी मनोज गुप्ता या वासनांध बापा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला.
कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात सदर पिडीत अल्पवयीन मुलगी आई व सावत्र पित्यासह राहते. सदर पिडित मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत तिच्या सावत्र पित्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच सदर प्रकार कुणाला सांगितलं तर तुझ्या आईला मारून टाकेन अशी धमकी दिली. या प्रकरणी सदर पिडीत मुलीने कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असुण या तक्रारी नुसार पोलिसांनी मनोज गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला.