वारंवार उद्‌भवणाऱ्या धोक्यांसाठी आपत्ती लवचिकता सुधारण्यासाठी अधिक गुंतवणुकीचे भारताकडून समर्थन

नवी दिल्ली, दि.०६ – आपत्तीचा धोका कमी करण्याबाबत आशियाई मंत्रिस्तरीय परिषदेच्या तिसऱ्या दिवशी आपत्ती लवचिकतेत अधिक गुंतवणूक, पायाभूत विकासात आपत्ती लवचिकता आणणे आणि उष्णतेच्या लाटेसारख्या वारंवार उद्‌भवणाऱ्या धोक्यांबाबत पूर्वसूचना प्रणालीत सुधारणा करण्याची सूचना भारताने केली. उलान बाटर येथे ही परिषद सुरू आहे. या परिषदेत इंडोनेशिया, फिलिपीन्स, व्हिएतनाम, मंगोलिया आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी सर्व देशांना आपत्तीचा धोका कमी करणे हा अर्थसंकल्पाचा एक अविभाज्य भाग असल्याच्या दृष्टीकोनातून पाहण्याचे आवाहन केले.

अन्य एका कार्यक्रमात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आर. के. जैन यांनी उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू रोखण्यात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email