वांद्रे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला आग, तिकीट काऊंटरपर्यंत झळा
महत्त्वाचं म्हणजे ही आग पसरत वांद्रे स्टेशनच्या तिकीट काऊंटरपर्यंत पोहोचली आहे.
( म विजय )
मुंबई : मुंबईतील वांद्रे स्टेशनच्या पूर्वकडेली झोपडपट्टीत आग लागली आहे. झोपडपट्ट्यांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरु असताना आग लागली.
वांद्रे स्टेशनच्या रेल्वे रुळाच्या अगदी लागूनच ही झोपडपट्टी आहे. दाटीवाटीच्या वस्तीमुळे तसंच आग आतल्या बाजूला लागल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास अडचण येत आहे.
महत्त्वाचं म्हणजे ही आग पसरत वांद्रे स्टेशनच्या तिकीट काऊंटरपर्यंत पोहोचली आहे.
अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि 10 वॉटर टॅंकर दाखल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. आग नेमकी कशी आणि कशाला लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही.
Please follow and like us: