वल्लभभाईंना तरी हे ‘पटेल’ का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सवाल

‘देशात अनेक समस्या ‘आ’वासून उभ्या असताना २२९० कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारणं हे खुद्द वल्लभभाईंना तरी पटेल का,’ असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून राज यांनी मोदींच्या पटेल भक्तीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

तब्बल २,२९० कोटी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र, पुतळ्यावर इतका खर्च करण्याऐवजी हा पैसा विकासकामांसाठी वापरता आला असता असा एक सूर देशभरातून उमटतो आहे. राज यांनी नेमका हाच धागा पकडून मोदींना टोला हाणला आहे. राज यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदी पटेलांच्या व्यंगचित्रासमोर हातात हार घेऊन उभे असल्याचं दिसत आहे. सोबत अमित शहा आणि इतर नेतेही उभे आहेत. मात्र, ज्यांचा पुतळा उभारला जातोय ते पटेलच या पुतळ्याबद्दल नाखुश असल्याचं दिसतंय. ‘स्वार्थी राजकारणासाठी हजारो कोटी खर्च करून माझा पुतळा उभा करण्यापेक्षा जिवंत माणसं जगवा’, असा सल्लाच ते मोदींना देत असल्याचं राज यांनी दाखवलं आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email