वरळीत साकारली भारतातील सर्वात उंच होळी

(म.विजय)

मुंबई- होळी म्हटले की मुंबईत ती मोठया उत्साहात साजरी केली जाते. यंदाही मुंबईतील वरळी बीडीडी चाळीत अनोख्या पद्धतीने होळीचे दहन करत सर्वांचे लक्ष बीडीडी चाळीतील आपला विग्नहर्ता या मंडळाने वेधून घेतले आहे. यंदा या मंडळाने सध्याच्या गाजलेल्या डायमंड किंग निरव मोदी यांची प्रतिकृती साकारत होळीचे दहन करणार आहे. विशेष म्हणजे ही होळी भारतातील सर्वात उंच होळी म्हणून सध्या वरळीत ही होळी सर्वांचे आकर्षण बनली आहे. ५८ फूट अशी उंच ही होळी बांधण्यात आली आहे.
दरवर्षी या मंडळातर्फे होळी च्या माध्यमातून अनेक विषयांवर आवाज उठविला जातो तर एखादा सामाजिक संदेश दिला जातो यंदा या होळीतून भ्रष्टाचारावर भाष्य करत होळी साकारण्यात आली आहे. सर्वांसाठी वरळीत या होळीचे आकर्षण ठरले आहे. मोठया संख्येने लोक ही होळी पाहण्यासाठी एकच गर्दी करत आहेत.
गेले ५ ते ६ वर्षे या मंडळातर्फे अनेक सामाजिक विषयवार भाष्य करणारी होळी साकारण्यात येते. गेले २ आठवडे ही होळी बनविण्यासाठी मंडळातील कार्यकत्यांनी मेहनत घेत ही होळी साकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.