वणी-यवतमाळ मार्गावर अपघात ; दोन ठार ७ जखमी
वणी – वणी-यवतमाळ मार्गावरील बोटोणी गावाजवळ भरधाव ट्रकने दोन कारना धडक दिल्याने भयंकर अपघात झाला.यात एकाच कुटुंबातील दोन जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले.जितेंद्र रामदयाल सिडाणा (४०) आणि किरणताई मोहन सिडाणा (३७) अशी मृतांची नावे आहे. तर श्रीराम दयाराम सिडाणा , दिव्या जितेंद्र सिडाणा , नितू श्रीराम सिडाणा , इंदर दीपक चन्ना , रश्मी इंदर चन्ना , कान्हा श्रीराम सिडाणा , लाडो जितेंद्र सिडाणा , हे जखमी झालेत. शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास हा अपघात घडला.
Please follow and like us: