वडील असल्याचे सांगत ब्लॅकमेल करत बदनामी ची धमकी इसमाला देत १० लाखांची मागणी

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०४ – केरळ मधील विनू मोनू कन्नोली नावाच्या इसमाने डोंबिवलीतील रहिवासी असलेल्या सालेश विश्वभरण यांना फोन करून तुम्ही आपले वडील असून मला पैशाची गरज आहे. यामुळे मला १० लाख रुपये द्या अन्यथा फेसबुकवर तुमच्यासह तुमच्या कुटूबाचे फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी दिल्या प्रकरणी सालेश विश्वभरण यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दखल केली आहे.

डोंबिवलीत राहणार्या सालेश विश्वभंरण यांना १ एप्रिल पासून विनू मोनू कन्नोली नावाचा इसम दूरध्वनी वरुण संपर्क करत त्यांना तुम्हीच आपले वडील असून आपल्या गरोदर आईला ३३ वर्षापूर्वी सोडून निघून गेलात आणि मुंबईत जाऊन दुसरे लग्न करून आपल्याला वार्यावर सोडल्याची बतावणी करत त्यांच्याकडून १० लाख रुपये उकलण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्याच्या बदनामी करण्याच्या धमकीला विश्वभंरण नमत नसल्याचे लक्षात येताच. त्याच्या मैत्रिणीने त्यांना फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. तर त्याने विश्वभरण यांच्या भावाला त्रास देत फेसबुकवर बदनामी सुरु केल्या प्रकरणी विश्वभरण यांनी अखेर संबधित इसमा विरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. दरम्यान एका चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशा प्रकारे कथानक रचत ब्लकमेल करण्याची हि घटना उघड झाल्याने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email