वडा पाव ,भुर्जी पाव गाडी चालकांची दादागिरी ,पोलीस कर्मचार्याला शिवीगाळ व धक्काबुक्की 

श्रीराम कांदु

कल्याण : बेकायदेशीर रित्या उभ्या असलेल्या वडा पाव व भुर्जी पाव च्या गाड्या हटवण्यास सांगितल्याने सबंधित गाडी चालकाणे पोलीस कर्मचार्यास अरेरावी ची भाषा करत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे .या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात राजू माटा व आदेशां गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे .

डोंबिवली पूर्वेकडील सार्वजनिक रस्त्यावर राजू माटा हा वडा पाव चे दुकान लावतो काल रात्रीच्या सुमारस पोलीस कर्मचार्यांनी त्यांना दुकान बंद करण्यास सांगितले त्यावेळी संतापेल्या राजूने ने या कर्मचार्याला माझा दुकान बंद करायचे नाही किती पैसे पाहिजेत ते संग असे बोलत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात राजू माटा विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे तर दुसरी घटना मधुबन तोकीज च्या परिसरात घडली .या ठिकाणी आदेश गायकवाड नावाचा इसम भुर्जी पाव चे दुकान लावतो काल रात्री एक वाजण्याच्या सुमारस पोलिसांनी त्याला दुकान बंद करण्यात सांगितले असता त्याने पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली .या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करत आदेश ला अटक केली आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email