वंश वादातून घर पेटवले मयूर कार्लेकर मूळचे डोंबिवलीकर
डोंबिवली दि.२० – ब्रिटनमध्ये १९ वर्षांपूर्वी स्थायिक झालेले मयूर कार्लेकर याचे केंट (ब्रिटन) मध्ये वंश वादातून घर पेटवण्यात आल्याचे वृत्त वाहिन्यांवर प्रसारित झाले आहे. मयूर कार्लेकर हे मूळचे डोंबिवलीकर असून त्याचे वयोवृद्ध आई वडील डोंबिवलीत रहात आहेत. फडके रोडवरील “शलाका” सहकारी सोसायटीत रहात आहेत.
त्यांचे वृद्ध आई वडील व मोठा भाऊ सध्या रहात आहेत वडील भारत संचार निगम मध्ये कामाला होते व ते निवृत्त झाले डोंबिवलीत येण्यापूर्वी ते कल्याणला कोळसेवाडी येथे रहात होते व २० वर्षांपूर्वी डोंबिवलीत रहाण्यास आले. ब्रिटन मध्ये नक्की काय झालं माहीत नाही मात्र वंश वादामुळे असे झाले असेल असं वाटत नाही असे आई वडील सांगत होते.
सहा महिन्यांपूर्वी आम्ही तिकडे जाऊन आलो व आम्हाला अस वातावरण दिसले नाही असेही ते म्हणाले गोरा काळा वाद सध्या तरी दिसत नाही व मुलाने पण नक्की काय झाले हे फोनवर सांगितले नाही त्याने केवळ घर जळाले इतकंच सांगितले असेही ते म्हणाले डोंबिवलीत मयूर कार्लेकर यांचे बाबत फारशी कुणाला माहिती नाही असेही आढळून आले