लोनचे आमिष दाखवून ८४ हजारांना गंडा

डोंबिवली दि.२२ – कल्याण पूर्वेकडील नेतिवली ओमकार नगर येथील शिवालय कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे प्रभाकर देशपांडे यांना पुणे येथे राहणाया कुलकर्णी नावाच्या भामट्याने लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत पैशाची मागणी केली. लोन मिळणार या अमिषाला बळी पडत देशपांडे यांनी कुलकर्णी यांना ८४ हजार रुपये देवू केले मात्र पैसे देवून बराच कालावधी लोटला मात्र लोन न मिळाल्याने देशपांडे यांनी कुलकर्णीला जाब विचारला. मात्र कुलकर्णीने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्यचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात धावा घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी कुलकर्णी विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email