लोनचे आमिष दाखवत ४९ हजारांना गंडवले
डोंबिवली – लोन कमी टक्क्यात दुसर्या बँकेत ट्रान्स्फर करून देण्याचे आमिष दाखवत दिलेल्या क्रॉस चेक वर खाडाखोड करत हा चेक बँकेत वटवून एका इसमाला तब्बल ४९ हजारांना गंडा घातल्याची घटना डोंबिवली मध्ये उघडकीस आली आहे या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी कुणाल राजेश्वरी या भामट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे .
डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली रोड येथे शरद निवास या इमारती मध्ये राहणारे बंसराज मिश्रा यांना जानेवारी महिन्यात कुणाल राजेश्वरी या भामट्याने संपर्क साधत त्यांना तुमचे सुरु असले लोन कमी टक्क्याने दुसर्या बँकेत ट्रान्स्फर करून देतो असे आमिष दाखवले .या भामट्याने त्याच्याकडून लोन संदर्भातील कागद पत्र व दोन चेक त्यामधील एक क्रॉस चेक घेतला .काही दिवसापूवी या भामट्याने सदर चेकवर खाडाखोड करत सदर चेक वटवून मिश्रा यांच्या बँक खात्यातून तब्बल ४९ हजार रुपये काढून घेतले सदर बाब निदर्शनास येताच मिश्रा यांनी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दाखल केला असताना पोलिसांनी या तक्रार अर्जा नुसार कुणाल राजेश्वरी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे