लोखंड आणि पोलाद उत्पादनांच्या देशांतर्गत मागणीत भरघोस वाढ
नवी दिल्ली, दि.१० – पोलाद मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे जून 2017 ते ऑक्टोबर 2018 या काळात लोखंड आणि पोलाद उत्पादनांच्या देशांतर्गत मागणीत 8 हजार 129 कोटी रुपयांची भरघोस वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रेल्वे मंत्रालय, ओएनजीसी, गेल, ईआयएल तसेच एचपीसीएल कंपन्यांनी देशी लोखंड आणि पोलाद उत्पादक कंपन्यांकडे विविध उत्पादनांसाठी नोंदणी केली. यापूर्वी ही उत्पादन आयात केली जात, मात्र आता ती देशांतर्गत उत्पादकांकडून खरेदी केली जात आहेत.
Please follow and like us: