विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणकरांचा याज्ञवल्क्य संस्थेतर्फे दर 2 वर्षांनी गौरव केला जातो. यंदाचा पुरस्कार ‘ग्रंथसखा’ संकल्पनेद्वारे वाचन संस्कृतीसाठी आपले आयुष्य अर्पण केलेल्या शाम जोशी याना आणि रामायण – ग्रीक महाकाव्यावर संशोधन तसेच लेखन करणाऱ्या प्राध्यापिका स्मिता राम कापसे यांना प्रदान केला जाणार आहे. प्रा. स्मिता कापसे या दिवंगत नायब राज्यपाल राम कापसे यांच्या पत्नी असून त्यांनी ‘रामायणीय’ आणि ‘ग्रीक महाकाव्य’ या ग्रंथाचे लेखन केले आहे. तर शाम जोशी यांना नुकताच राज्य शासनाने पहिला कवीवर्य मंगेश पाडगावकर ‘भाषा संवर्धक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या दोघांचा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.