लोकअदालतीत ३ हजाराहून अधिक दावे निकाली
(श्रीराम कांदु )
ठाणे दि.१२ : ठाणे येथे झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात ३ हजार ६४४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाची एकूण १७६ प्रकरणाचा समावेश आहे . या लोकअदालतीत सर्व प्रकरणात एकूण १२कोटी ६ लाख १६ हजार ५१ रुपये रकमेबाबत हुकुमनामे झालेले आहेत.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस .एम. गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , ठाणे येथे या लोकअदालतीचेआयोजन करण्यात आले होते . या अदालतीमध्ये जिल्ह्यातील एकूण प्रलंबित आणि दावा दाखलपूर्व मिळून ४८ हजार ९९९ प्रकरणे ठेवण्यात आली होती. जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी आणि वकील संघटना तसेच न्यायालयीन कर्मचार्यांनी परीश्रम घेतले असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव पी .एम. मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारेकळविले आहे. .
Please follow and like us: