लेकीच्या नावाने पालकांनी केली १ हजार ७१५ वृक्षांची लागवड

‘वनराणी’ उपक्रमाला पालकांचा उदंड प्रतिसाद

ठाणे दि.०३ – आम्ही वृक्षांचे तसेच मुलींचे संगोपन करू मुलींना वाढवू ,शिकवू ,तसेच त्यांचे आरोग्य पोषण याबाबत दक्ष राहू आम्ही मुलींचा विवाह 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही. तसेच त्यांना उच्च शिक्षणाची संधी सदैव देऊ. असा स्वरुपाची पालकांनीप्रतिज्ञा घेत तब्बल १ हजार ७१५ वृक्षलागवड केली. यावेळी लेकीच्या प्रगती सोबत वृक्षसंवर्धन करू असा निर्धार पालकांनी व्यक्त केला.

ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून “बेटी बचाओ बेटी पढाओ” हा राष्ट्रीय उपक्रम जिल्हास्तरावर समक्षपणे राबवण्यासाठी ‘वनराणी’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत रविवारी पार पडलेल्या महावृक्षारोपणाच्या काळात ज्यांना मुलगी आहे. असा पालकांनी मुलीच्या नावे त्यांच्या आवारात वृक्षाची लागवड करत जिल्ह्यातील पालकांनी ‘वनराणी’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला.

या योजने सोबतच जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रा अंतगर्त ४ हजार ७२० वृक्षांची लागवड करत महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून आता पर्यंत एकूण ६ हजार ४३५ वृक्ष लागवड करण्यात आल्याचे महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. शहापूर,मुरबाड,भिवंडी या आदिवासी क्षेत्रांमध्ये मुलींच्या आरोग्य,पोषण,शिक्षण याकडे पालक दुर्लक्ष करतात. शिवाय बाल विवाह देखिल होतात. मात्र या उपक्रमामुळे हे चित्र बदलण्यास मदत होणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email