‘लिटील हार्बर’ या स्लोवाकियन चित्रपटाने युरोपीयन चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी आज नवी दिल्लीत युरोपीयन संघ चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे, युरोपीय संघाच्या शिष्टमंडळाचे उपप्रमुख रायमंड मॅजिस, स्लोवाक प्रजासत्ताकच्या दुतावासाच्या उपप्रमुख कतरीना टोमकोवा, ‘लिटील हार्बर’ चित्रपटाच्या निर्मात्या कतरीना नाकोवा, चित्रपट महोत्सव संचालनालयाचे अतिरिक्त संचालक चैतन्य प्रसाद आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ‘लिटील हार्बर’ हा स्लोवाकियन चित्रपट दाखवण्यात आला.
हेही वाचा :-पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार
चित्रपटाची कथा पाहणे आणि लोकांना भेटणे हाच चित्रपट महोत्सवाचा आत्मा आहे, असे कर्नल राज्यवर्धन राठोड यावेळी बोलतांना सांगितले. चित्रपट पाहतांना विविध देशांच्या भाषा, संस्कृती, वर्ण यांचा अडसर नाहीसा होतो आणि कथेद्वारे कोणत्याही देशाशी संवाद साधता येतो, असे ते म्हणाले. चित्रपटातील भाषा समजत नसली तरी देहबोली द्वारे भावना समजतात, असे ते म्हणाले.
हेही वाचा :- जीएसटीमुळे अर्थव्यवस्था नियमित झाली आणि करदात्यांची संख्या वाढली
या महोत्सवात 23 युरोपीयन देशांचे 24 नवीन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. भारतातील नवी दिल्ली, चेन्नई, पुणे, कोलकाता, जयपूर, हैदराबाद, गोवा यासह 11 शहरांमध्ये 18 जून ते 31 ऑगस्ट दरम्यान हा महोत्सव पार पडेल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाने युरोपियन संघाचे प्रतिनिधी मंडळ आणि युरोपियन संघाच्या सदस्य देशांच्या दुतावासांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.