लिकटेंस्टीनचे राजपुत्र अलोईस यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली, दि.१३ – लिकटेंस्टीनचे राजपुत्र अलोईस यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट घेतली. राजपुत्र अलोईस यांचे भारतात स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाले की, उभय देशांच्या राजनैतिक संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्यांचा हा दौरा अतिशय खास आहे. लिकटेंस्टीनबरोबर आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत भारत उत्सूक असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. त्यांनी लिकटेंस्टीनच्या कंपन्यांना भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.
Please follow and like us: