लाखो रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त एकास अटक

मुंबई दि.२३ – मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत विरार फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षाने लाखो रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या ठिकाणी सापळा रचून एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. या व्यक्तीकडून सव्वासात लाख रुपये किमतीच्या ‘एल्को-१’ या नावाच्या गोळ्यांचा साठा हस्तगत केला.

हेही वाचा :- संशयित जलमापक चोरांची छायाचित्रे देऊनही कारवाई करण्यास पोलीसांची टाळाटाळ

याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता इतर दोन साथीदारांची नावे त्याने दिली. त्याच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांना अटक करून त्यांच्याकडून आणखी सहा लाख रुपयांचे एल्को हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.या प्रकरणी एकूण तीन आरोपींना पकडून त्यांच्याकडून वाहन आणि अमली पदार्थाच्या गोळ्या अशा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email