लाखोंच्या बनावट नोटा जप्त ;खंडणी विरोधी पथकाची करवाई
ठाणे- ठाणे शहरातील धर्मवीर नगर येथे ज्ञानसाधना कॉलेज जवळ एक व्यक्ति बनावट नोटा घेवुन येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी एक टीम बनवून वागले इस्टेट येथे सापाळा रचून प्रकाश प्रसाद उर्फ शंकर टोकन माहतो(४२) याला अटक केली.तो धर्मवीर नगरला राहत असून व मुळचा गाजियाबाद येथील आहे. त्याची तलाशी घेतली असता एकुण २ लाख़३१हजार २००च्या बनावट नोटा हस्तगत केल्या.पोलीसांना हा बनावट नोटांचा कारभार बांगलादेस येथून चालत असल्याचा संशय आहे.
अटक प्रकाश प्रसाद याच्याकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने त्याचा मित्र हेमलाल पंडित जो झारखंड राज्यातील हजारीबाग येथील आहे त्याच्याकडून 30% रक्कम देवून आणले होते. जे तो ६० % किमतीत विकणार होता.याप्रकरणी क्राइम ब्रांचचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे , सहायक पोलीस आयुक्त शोध – दोन, क्राइम ब्रांच शाखेचे एंन टी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमीरे, पोलीस उप निरीक्षक अविनाश महाजन ,पोलीस उप निरीक्षक विकास बाबर, पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले, पोलीस उपनिरीक्षक संदेश गांवड एवं अन्य अधिकारी यांनी ही करवाई केली.