लाकडाच्या वखारीला लागलेली आग नजीकच्या गोदामापर्यंत पोहोचली,परिसरातील चार ते पाच गावांना धोका

पनवेल :- लाकडाच्या वखारीला लागलेली आग नजीकच्या गोदामापर्यंत पोहोचली. आग इतकी भीषण आहे की त्यामुळे परिसरातील चार ते पाच गावांना धोका निर्माण झाला आहे. रविवारी सायंकाळी 6:30 वाजता ही आग लागली.

पनवेल तालुक्यांतील कोळखे गावानजीक नॅशनल टिम्बर मार्ट ही लाकडाची वखार आहे. या वखारीला रविवारी 27 मे ला सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग नजीकच्या सीसीआय लॉजिस्टिक प्रा. लि. या गोदामापर्यंत पोहोचली. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे पळस्पे, पेठ, उसरली, पारपुंड, डेरवली या गावांना धोका आहे. पनवेल महापालिका, नवीन पनवेल सिडको, तळोजा एमआयडीसी, ओएनजीसी आदी अग्निशमन दलाच्या चार गाड्या आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email