लघुशंकेसाठी गेलेल्या रिक्शाचालकाची रिक्शा घेवुन प्रवासी पसार

कल्याण – नवनवीन शक्कल लढवून लोकांना गंडा घालायचे प्रकार सद्ध्या वाढू लागले आहेत . लघुशंकेसाठी गेलेल्या रिक्शाचालकाची रिक्शा अशाच प्रकारे चोरल्याची घटना नुकातिच कल्याण येथे घडलियं . कल्याण पश्चिमच्या इंदिरा नगर विभगात राहणारे रवि पारवे हे  बुधवारी दुपारी 3:00 वाजता दरम्यान खड़क पाड़ा सर्कल येथे जात असताना त्यांच्या रिक्षेत काही प्रवासी बसले. यातील काही प्रवासी वाटेत उतरले व  भाड़े देवून निघून गेले. परन्तु एक प्रवासी रिक्शाताच होता त्याला घेवुन रवि पारवे उल्हासनगरच्या दिशेने निघाले. वाटेत रवि पारवे याना लघुशंका आली व ते एका निर्जन रस्त्यावर रिक्शा थांबवुन लघुशंकेसाठी गेले.या संधीचा फायदा घेत आतील प्रवासी रिक्शा घेवुन पसार झाला . रवि पारवे यांनी तीन दिवस आपली रिक्शा शोधली परन्तु रिक्शा न सापडल्याने त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email