लग्नाच्या रिसेप्शन मध्ये नाचताना बघितले म्हणून दोन गटांत हाणामारी
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०४ – लग्न समारंभात नाचताना बघितल्याने झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना कल्याण नजीक मोहने येथे घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
कल्याण नजीक असलेल्या आंबिवली अटाळी रोड येथील सत्यम बिल्डींग मध्ये राहणारे किरण पाटील सोमवारी आपल्या मित्रांसह संध्याकाळी तीप्न्ना नगर येथे एका लग्नाच्या रिसेप्शन साठी गेला होता. या कार्यक्रम संपवून रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या दिशेने दुचाकीने जात असतांना तीप्न्ना नगर येथील शौचालय जवळ वीरमण वेली ,कमल करणानदी ,विरण बालसुंदरम ,भालू मुर्वन यांनी त्यांना वाटेत अडवले. त्यांनी पाटील यांना लग्नाच्या रिसेप्शन मध्ये नाचताना तू आमच्याकडे का बघत होता असे विचारत शिवीगाळ करत लोखंडी रोड ने सिमेंट च्या पत्र्याने मारहाण केली .तसेच किरण यांना मारहाण होत असतांना त्यांना वाचवण्यास आलेल्या प्रीतम याला देखील लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत किरण पाटील व त्यांचा मित्र प्रीतम दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी किरण पाटील यांनी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी वीरमण वेली ,कमल करणानदी ,विरण बालसुंदरम ,भालू मुर्वन विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे. तर विरेन बालसूदरम याने देखील किरण पाटील व त्याच्या मित्रानी आपल्याला काही कारण नसताना मारहाण केल्याची तक्रार खडकपाडा पोलीस स्थानकात दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी किरण पाटील सह विनोद रविचंद्रण ,प्रमोद ,गोपाल विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.