लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

बीड – लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करणाऱ्या  आणि तरूणी गर्भवती राहिल्यानंतर लग्नाला नकार देणाऱ्या  तरूणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नेकनूर पोलीसात दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला तरूण लिंबागणेश येथील असून ही तरूणी वैद्यकिन्ही येथील आहे.

 

२२ वर्षीय तरुणाने वैद्यकिन्हीवरून शिक्षणासाठी लिंबागणेशमध्ये येणार्‍या विद्यार्थिनीला आपल्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यातून  मुलगी ही गर्भवती राहिली. तिने या तरुणाकडे विवाह करण्याची मागणी केली. परंतु तरुणाने नकार दिला. त्यानंतर त्या मुलीने पोलिसात तक्रार दिली.

 

वैद्यकीन्ही येथील १९ वर्षीय विद्यार्थीनी लिंबागणेश येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी येत होती. २०१७ मध्ये सदरील विद्यार्थिनीचे आणि लिंबागणेश येथील २२ वर्षीय निलेश महादेव ढास याच्याशी सूत जुळले. दोघांचे प्रेम संबंध वाढत गेले. निलेश याने सदरील मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. हे दोघे एकत्रित फिरूही लागले. २ ऑगस्ट २०१७ रोजी निलेशने सदरील विद्यार्थिनीला कपिलधार येथे फिरायला नेले. त्याठिकाणी त्या दोघांचे शारीरिक संबंध झाले. यातून मुलगी ही गरोदर राहिली. सध्या ती मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचे सांगण्यात येते. मुलगी जेव्हा मुलाला लग्नाबाबत विचारू लागली त्यावेळी निलेशने विरोध दर्शविला. यानंतर मुलीने नेकनूर पोलिसात निलेश ढास विरोधात तक्रार दाखल केली. मुलीच्या फिर्यादीवरून  बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास  पोलिस निरीक्षक गणेश मुंडे, पीएसआय जाधव, पो.हे.कॉ. आदटराव, बागवान, ढाकणे, यादव, लोखंडे, बोबडे, महिला कॉन्स्टेबल डोके हे करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email