लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार प्रतिकार करणाऱ्या पीडितेला केली मारहाण – डोंबिवलीतील घटना

कल्याण दि.१९ – पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत शरीर संबधांची मागणी केली पीडितेने नकार देतात संतापलेल्या नराधमाने तिला शिवीगाळ करत मारहाण करत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना डोंबिवलीमध्ये उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर नराधम पाच वर्षापासून या पीडितेवर अत्याचार करत होता. या जाचाला कंटाळुन या नराधमा विरोधात पीडितेने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी धिरेंद्र राजभर विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. कल्याण शीळ रोड वरील पिसवली परिसरात सदर पीडित तरुणी राहते.

हेही वाचा :- खंडणीसाठी चक्क एका म्हशीचे अपहरण

पिसवली येथील ओम साई नगर चाळीत राहणारा धिरेंद्र राजभर याच्यशी 2013 मध्ये ओळख झाली होती. धिरेंद्र ने सदर पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत शरीर संबंधाची मागणी केली मात्र सदर पीडित तरुणीने नकार देताच त्याने तिला शिवीगाळ व मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने सतत पाच वर्षे या पीडितेवर अत्याचार करत लग्नास नकार दिला. अखेर या जाचाला कंटाळून तिने काल या प्रकरणी मानापाडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी धिरेंद्र राजभर विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email