मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथील घटना, सलग दुसऱ्या दिवशी अपघाताने घबराट. लक्झरी पलटून २६ प्रवासी जखमी
(म विजय )
खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण-संभाजी नगर येथे विशाल ट्रॅव्हल्स या खासगी बसला आज सकाळी ६.२० ला अपघात झाला. या अपघातात बसमधील २६ प्रवासी जखमी झाले आहेत. खारेपाटण मध्ये सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला. शनिवारी रामेश्वर ट्रॅव्हल्स ला झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाले होते. त्यामुळे बस प्रवाशांमध्ये खबराट पसरली आहे.
परेल-मुंबई येथून ही बस सावंतवाडी-बांदा येथे चाललेली होती. खारेपाटन प्रा.आ.केंद्रात जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले. गंभीर ७ जखमी प्रवाशांना कणकवली येथील ग्रामीण रूग्नालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
Please follow and like us: