रोजगार देण्याचे प्रलोभन दाखवून राजस्थानला नेवून मुलीला विकले,
कल्याण-मोठ्या रोजगाराचे प्रलोभन दाखवून तरुणीला राजस्थानला नेऊन विकल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे.याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण येथील दुर्गाडी रेतीबंदर झोपडपट्टीत महिला आणि तिची विवाहित मुलगी राहते.या मायलेकी बिगारी काम करीत असत. त्यांची ओळख माला शर्मा हिच्याशी झाली. तिने त्यांना कल्याण, भिवंडी या ठिकाणी काही दिवस मजुरीचे काम मिळवून दिले. आमच्या गावाला मोठे मजुरीचे काम मिळेल, असे प्रलोभन दाखवत दोघींना राजस्थानला नेण्यात आले. तेथे पोहोचल्यावर आईला घरात थांबवून ठेवण्यात आले.तर तरुणीला कामानिमित्ताने अन्य ठिकाणी नेण्यात आले.बरेच दिवस होवुनही मुलीची भेट न झाल्याने आईने विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तिने अधिक चौकशी केल्यावर जयपूर येथे मुलीला एका व्यक्तीला दीड लाखाला विकल्याचे समजल्यावर तिला धक्काच बसला.तरुणीच्या आईने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल असून त्याआधारे माला शर्मा, विष्णू शर्मा, मनोहर शर्मा, रामेश्वर यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.