रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे हार्दिक आभार,ठाण्यापल्याड प्रवाशांना मिळणार १६ वाढीव फेऱ्या.
( म विजय )
एक नोव्हेंबर पासून मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार असून त्या सर्व ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत. ठाण्यापुढील वाढती गर्दी लक्षात घेता अधिकाधिक फेऱ्या ठाण्यापुढील स्थानकांसाठी सुरू होणार त्यानुसार दादर-बदलापूर (२), दादर-टिटवाळा (२), दादर-डोंबिवली (६) आणि कुर्ला – कल्याण (६) अशा वाढीव फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या वाढीव गाड्यांमध्ये महिलांसाठी तीन ज्यादा डबे राखीव ठेवण्यात येणार आहेत. उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असल्याने प्रवाशांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहे.
Please follow and like us: