रेल्वे पुलाची रुंदी वाढवा व दुरुस्ती करण्याची मागणी

डोंबिवली दि.१४ – डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या कल्याण दिशेकडील पादचारी पूल अरुंद असतानाही या पुलाचामोठ्या प्रमाणात प्रवाशाकडून वापर केला जातो यामुळे या पुलावर गर्दी होते यामुळे जुन्या आणि अरुंद झालेल्या या पुलाची रुंदी वाढविण्याऐवजी आर पीएफने प्रवाशांना या पुलाचा वापर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे बनर पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आले असून प्रवाशांनी या कृती बद्दल संताप व्यक्त केला आहे. मध्यतरी रेल्वेने समिती नेमली होती त्या समितीने पुलाची दुरुस्ती करून रुंदी वाढवण्याची शिफारस केली होती

डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कल्याण दिशेकडील पूल जुना असून चालताना हा पूल कंपन पावत असल्यामुळे या पुलाची डागडुजी करण्याची मागणी प्रवाशाकडून होत आहे. या पुलावरून थेट बस स्टोप आणि रिक्षा स्टनड पर्यत जाता येत असल्यामुळे रेल्वे प्रवासी मोठ्या प्रमाणात या पुलाचा वापर करतात. रेल्वेने नव्याने बांधलेले पूल छोट्या उभ्या पुलाने या पुलाला जोडले असले तरी प्रवाशांना या मार्गाचा वळसा पडतो. लोकल मधून उतरल्या नंतर रिक्षा साठी लाब्म्च लाब रांगा लावाव्या लागत असल्यामुळे प्रवासी या पुलावरून लवकर रिक्षा बसच्या रांगेत पोचण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमानात गर्दी होते. मुंबई दिशेकडील पूल रुंद असले तरी या पुलावरून जाणार्या प्रवाशाची संख्या तुलनेने कमी आहे. तर मधल्या नव्या पुलाचा वापर अजूनही प्रवाशाच्या पचनी पडलेला नसून या पुलाचा फारसा उपयोग प्रवाशाकडून होत नाही. मात्र आता सर्वाधिक वापर असलेल्या आणि दिवसभर गर्दी असलेल्या कल्याण दिशेकडील पुलावर आर पीएफने बनार लावले असून यावर पादचार्यानि या पुलाचा वापर करू नका कारण हे पूल अरुंद असल्याने या पुलावरील गर्दी वाढत आहे. यामुळे प्रवाशांनी दुस-या पुलाचा वापर करून या पुलाचा वापर थांबवावा असे आवाहन केले आहे. मात्र सकाळी लोकल पकडण्याची घाई आणि संध्याकाळी घरी परतण्याच्या घाईत असलेल्या डोंबिवलीकराना हे बनर वाचण्या इतका देखील वेळ नसून प्रवासी या बेनर खालूनच गर्दी करून ये जा करत आहेत.

यामुळेच प्रवाशांना या पुलावरून ये जा बंद करण्यापेक्षा या पुलाची रुंदी वाढवून डागडुजी करण्याचा प्रशासनाने विचार करावा अशी मागणी प्रवाशाकडून केली जात आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email