रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई दि.२९ – कुर्ला ते विद्याविहार स्थानकामध्ये पादचारी पुलाचा गर्डर उभारण्यासाठी आज, शनिवार २८ जुलैला मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.४०पर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. विद्याविहार ते मशिद स्थानकांदरम्यान अप-धिम्या मार्गासह हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी मार्गावर मध्य रेल्वेनं रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. विद्याविहार ते मशिद स्थानकांदरम्यान रविवारी अप धिम्या मार्गावर सकाळी ११ वाजून २० मिनिटं ते दुपारी ४ वाजून २० मिनिटांपर्यंत दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

ट्रान्स हार्बर मार्गवरील लोकल सेवाही सकाळी १० वाजून १२ मिनिटं ते दुपारी ४ वाजून २६ मिनिटांपर्यंत बंद राहणार आहे. पश्चिम रेल्वेवरील भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व जलद, अर्धजलद लोकल स. १०.१६ ते दु. २.५४ पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, दिवा स्थानकात थांबतील. कल्याणहून सुटणाऱ्या सर्व जलद, अर्धजलद लोकल स. ११.०४ ते दु. ३.०६ पर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकातही थांबतील. सीएसएमटीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या सर्व लोकल स. ११ ते सायं. ६ पर्यंत किमान १० मिनिटे उशिराने धावतील, तर मेल, एक्स्प्रेस गाड्या किमान १५ मिनिटे उशिराने धावतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email