रेल्वेखाली उडी घेऊन तरुणाची आत्महत्या, हातावर आढळला मोबाईल नंबर

ठाणे – एका तरुणाने धावत्या रेल्वे लोकल गाडीखाली उडी मारुन आत्महत्या केली आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना आज (बुधवार) दुपारी घडली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने हातावर मोबाईल नंबर लिहिला होता.

भवरलाला सुवासिया (वय-२६), असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मृत भवरलाला चेंबूर परिसरातील रहिवाशी आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकातील डाऊन मार्गावरील स्थानक सुरू होण्याआधी अंबरनाथ लोकल गाडी स्थानकात येत असतानाच या तरूणाने त्या लोकल गाडीखाली उडी मारली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळल्यावर उल्हासनगर रेल्वे स्थानकात ड्युटीवर असणारे पोलीस हवालदार एस. आर. माने यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेत तरूणाच्या डोक्याला जबर मार लागला. त्याची कवटी फुटल्याने त्याचा मृत्यू झाला होता. मृत तरूणाचा मृतदेह माने यांनी मध्यवर्ती रूग्णालयात नेला. त्यावेळी त्यांना मृत तरूणाच्या डाव्या हातावर एक मोबाईल नंबर लिहिला असल्याचे निदर्शनास आला. या शिवाय त्याच्या खिशातदेखील एका चिठ्ठी आढळली. मोबाईल नंबरवर माने यांनी संपर्क साधला असता त्या तरूणाचे नाव भवरलाल सुवासिया असून तो चेंबूर येथील यशवंतनगर परिसरातील रहिवाशी असल्याचे समजले.

मृत तरुण हा विवाहित आहे. त्याचा लेडीज चप्पल बनविण्याचा व्यवसाय असल्याने बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास तो कामानिमित्त घरातून बाहेर पडला. मात्र उल्हासनगरात येऊन त्याने लोकल गाडीखाली झुकून आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाईल नंबर हातावर लिहून ठेवल्यामुळे त्याची ओळख पटली असल्याचे माने यांनी सांगितले. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Sources – ABI News

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email