रेरामुळे गृहनिर्माण उद्योगात सकारात्मक परिवर्तनीय बदल- हरदीप पुरी
रेराच्या या नवीन युगात गृहनिर्माण उद्योगात सकारात्मक परिवर्तन दिसून येत आहे असे गृहनिर्माण आणि शहरी कामकाज राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. रेराच्या अंमलबजावणीचे हे दुसरे वर्ष असून ईशान्येकडील 6 राज्ये व पश्चिम बंगाल वगळता सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी रेरा अंतर्गत नियम अधिसूचित केले आहेत असे ते म्हणाले. ते आज नवी दिल्लीत रेरासंबंधी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
गृहनिर्माण क्षेत्रात समानता, व्यावसायिकता आणि मानकांसाठी रेरा अंतर्गत, सर्व प्रकल्प आणि एजंटची नोंदणी अनिवार्य आहे. आतापर्यंत देशभरातील 33750 प्रकल्प आणि 26018 संस्थांनी नोंदणी केली असून 18392 प्रकल्प आणि 17188 एजंट्सच्या नोंदणीसह महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे ते म्हणाले. ईशान्येकडील राज्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्यात आली असून तिथेही लवकरच रेराची अंमलबजावणी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.