रुग्णाला बरे करण्यासाठी चक्क मंगेशकर रुग्णालयात मांत्रिकाला केले पाचारण?

महिलेचा अतिदक्षता विभागात दुर्दैवी मृत्यू

(म.विजय)

पुणे – काही दिवसांपूर्वी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णालयातीलच एका स्वच्छता कर्मचाऱ्याला व्यवस्थापकाच्या सुरक्षा रक्षकांनी चोरीच्या संशयावरून मारहाण केल्याची घटना समोर आली होती. तर त्यापूर्वी एका पुरुषाला गर्भाशय असल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला होता. तर त्यापूर्वी एकाने तेथील डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन लेटर चोरून, त्यावर बनावट सही करून त्याद्वारे नशेची औषधे घेतल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातच आता पुन्हा एक घटना समोर आली असून, चक्क एका महिलेवर अतिदक्षता विभागात डॉक्टर आणि परिचारिकांच्या उपस्थितीत मांत्रिक बोलावून उपचार केल्याची घटना एका व्हिडीओ मधून समोर आली आहे. मात्र सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या सोनवणे (वय २४, रा. दत्तवाडी, पुणे) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. छातीत दुधाची गाठ झाल्याने सोनवणे यांच्यावर उपचार सुरू होते. यासाठी त्यांना ‘आयसीयू’मध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी स्वारगेट येथील एका रुग्णालयामध्ये सोनवणे यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान ‘सोनवणे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली. त्यात रक्तस्राव झाला आणि त्यांना जीव गमवावा लागला’, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या महिलेचा काल पहाटे मृत्यू झाला.

दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गरीबांवर उपचार होतात. या ठिकाणी मांत्रिक बोलाविल्याची माहिती मिळत आहे. हा मांत्रिक रुग्णाच्या नातेवाईकांनी बोलाविला की रुग्णालयाने हा चौकशीचा भाग आहे. पूर्ण माहिती घेतल्यानंतर यावर बोलू’, असे बापट म्हणाले. शिवसेनेचे शहर संघटक सचिन तावरे यांच्यापर्यंत यासंदर्भात तक्रार गेल्यानंतर सदरील पूर्ण घटना उघडकीस आली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email