रुग्णालयातून एल.सी.डी.टीवी संच चोरून नेणा-याला अटक

श्रीराम कांदू 

ठाणे-ठाणे शासकीय रुग्णालयातून एल.सी.डी.टीवी संच चोरून नेणा-याला अटक करण्यात आली आहे.एका सफाई कर्मचा-याच्या सतर्कतेतुन हा प्रकार उघडकीस आला.

याबद्दल अधिक वृत्त असे की २९ जानेवारी रात्री १ वाजता या  रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील दन्त चिकित्सा ओपीडी विभागाच्या भिंतीवर लावलेला एल.सी.डी.टीवी चोरून राजेन्द्र निरुखेकर नावाचा इसम तेथून पळ काढत होता.सफाई कर्मचारी अजय सोलंकी यांच्या ही गोष्ट लक्षात आली.सोलंकी यांनी आरडाओरडा करुन सदर चोराला पकडून दिले.याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email