रुंदे गावाजवळ काळू नदी वरील पूल गेला पाण्याखाली १२ वाचा शहराशी संपर्क तुटला

डोंबिवली दि.१५ – कल्याण तालुक्यातील रुंदे गावाजवळ काळू नदीवर असणारा फुल रविवारी सकाळी सातच्या सुमारास पाण्याखाली गेल्याने या ठिकाणच्या १२ ते १३ गावांचा संपर्क शहराशी तुटला आहे. कुठल्या प्रकारची घटना घडू नये म्हणून या ठिकाणी स्थानिक पोलिस व शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे टिटवाळा नजीक असलेल्या काळू नदीला पूर आला असून रुंदे गावाजवळील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे परिसरातील बारा-तेरा गावांचा शहराशी संपर्क तुटलेला आहे. सद्या नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. यामुळे हा लवकर ओसरण्याची शक्यता कमी असल्याचे नागरिकातून बोलले जाते. सकाळी सात वाजता हा पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक पूर्णत ठप्प झाली आहे. सुरक्षतेची काळजी म्हणून या ठिकाणी कल्याण महसूल विभाग व स्थानिक टिटवाळा पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अशा प्रकारची परिस्थिती पावसाळ्यात अनेक वेळा या ठिकाणी निर्माण होते. यामुळे येथील बारा ते तेरा गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी नवीन उंच पूल उभारण्यात यावा अशा प्रकारची मागणी येथील रहिवाशीतून करण्यात येत आहे. नागरिकांच्या या मागणीचा प्रशासन व राजकीय यंत्रणा विचार करेल का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email