रिक्षा रांगेत लावण्यावरून रिक्षा चालकांमध्ये वाद रिक्षा चालकासह त्याच्या पत्नीला मारहाण 

कल्याण – कल्याण पश्चिम इंदिरा नगर परिसरात राहणारे प्रदीप ओव्हाळ हे रिक्षाचालक गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिर्ला कॉलेज येथील रिक्षा स्टँड येथे आपली रिक्षा रांगेत उभी केली होती .याचवेळी त्यांचा नंबर आला असता त्यांनी  योगिधाम येथील प्रवासी आपल्या रिक्षात बसवला याच वेळी सावंता उर्फ सिद्धू गुणके उर्फ पिंट्या या रिक्षा चालकाने आपला नंबर असल्याचे सांगत ओव्हाळ यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करत ओव्हाळ याना ठोशाशाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली .यावेळी ओव्हाळ यांची पत्नी त्यांना वाचवण्यासठी मध्ये पडली असता संतापलेल्या सावंता याने तिला देखील मारहाण करत रस्त्यात पडलेला दगड ओव्हाळ यांच्या डोक्यात घातला .या हल्ल्यात ओव्हाळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात  आले आहे तर या प्ररकणी ओव्हाळ यांनी काल महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी सावंता उर्फ सिद्धू गुणके उर्फ पिंट्या या रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email