रिक्षा चालक संघटनेच्या वतीने डोंबिवलीत रिक्षाचालकांसाठी आरोग्य शिबिर

 डोंबिवली- रिक्षा चालक संघटनेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त ममता हॉस्पिटल आणि रिक्षा चालक संघटना डोंबिवलीच्या संयुक्त विद्यामाने डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनबाहेरील परिसरात रिक्षाचालकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. रिक्षाचालकांना दमा, मणक्याचा त्रास आणि मधुमेह  होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

   रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष विकास मोरजकर, उपाध्यक्ष दिंगबर लिंगायत, सरचिटणीस अशोक लावणे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पौर्णिमा सभागृहात संघटनेने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन मनसे शहर संघटक तथा परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा लाभ ५०० पेक्षा जास्त रिक्षाचालकांनी घेतला.रिक्षा चालवीत असताना रस्त्यांमधील खड्ड्यामुळे मणक्याचा त्रास, धुळामुळे श्वसनाचा त्रास असे अनेक आजार रिक्षाचालकांना झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर संध्याकाळी दशवतार नाटक ठेवण्यात आले होते. हे नाटक पाहण्यासाठी कोकणी आणि मालवणी चाकरमान्यांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.