रिक्षा चालकाने मारहाण करत लुबाडले डोंबिवलीतील घटना
(श्रीराम कांदु )
डोंबिवली :- दि. २१ डोंबिवली पूर्वेकडील कासारियो गोल्ड रीलेटा सोसायटी मध्ये राहणारे गणेश नायर हे काल रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पलावा रोड येथून घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभे होते यावेळी एका अज्ञात रिक्षा चालकाने रिक्षा थांबवून कुठे जायचे आहे असे त्यांना विचारले मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी रिक्षात बसण्यास नकार दिला त्यामुळे संतापलेल्या रिक्षा चालकाणे त्यांना शिवीगाळ करत ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली .आपली सुटका करून घेत नायर पुन्हा रस्त्याच्या दुसर्या बाजूने चालत असतांना या रिक्षा चालकाने जबरदस्तीने त्यांना रिक्षात बसवले व काही अंतरावर नेवून रिक्षा थांबवली व त्यना मारहाण करत त्याच्या जवळील रोकड ,मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला .या प्रकरणी नायर यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसनी अज्ञात रिक्षा चालका विरोधात गुन्हा दखल केला आहे.