रिक्षा चालकाने केला चाॅपरने हल्ला – डोंबिवलीतील घटना

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०८ – रस्त्याने आपल्या मित्रासह पायी चालणाऱ्या एका तरुणाला रिक्षा चालकाने भरधाव वेगाने रिक्षा चालवत कट मारली त्यामुळे संतापलेल्या रिक्षा चालकाने व त्याच्या साथीदाराणे या दोन तरुणावर चोपर ने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

डोंबिवली पूर्व मानपाडा रोड सांगाव येथील यशगंगा कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे नरेंद्र पाटील शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास महानगर पालिकेच्या डोंबिवली विभागिय कार्यलया नजीक असलेल्या रिक्षा स्टॅण्ड लगत आपल्या मित्रासह चालत जात होते. यावेळी अचानक एका भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षा ने त्यांना कट मारली. याचा पाटील यांनी सदर रिक्षा चालकाला जाब विचारला असता संतापलेल्या रिक्षा चालकने आणि त्याच्या साथीदाराणे नरेंद्र पाटील यांना शिवीगाळ करत चोपर ने हल्ला केला. यावेळी पाटील यांच्या मदतीला आलेल्या आयुब शेख या मित्रावर ही चोपर ने हल्ला करत जखमी केले. या हल्ल्यात दोघे ही गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात पाटील याने तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email