रिक्षा चालकांची मुजोरी वाढली ; पैशांच्या वादातून प्रवाशाला घरात घुसून मारहाण 

कल्याण – भाड्यावरून वाद घालत मुजोर रिक्षा चालकांनी एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकानजीक स्टँड वर घडली हे मुजोर रिक्षा चालक इथेच थांबले नाहीत तर त्यांनी या प्रवाशाचा पाठलाग करत त्याचे घर गाठले त्याच्या घरावर दगडफेक करत त्याच्या सह त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत मारहाण केली .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात अली असून या तक्रारी नुसार पोलिसानी सद्दाम शेख,मोहम्मद मुनावर अली खान,मोहन,जावेद खान,व अन्य एका साथीदारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
कल्याण पुर्वेकडील कचोरे पत्रिपुल परिसरात राहणारे रिंकू तिवारी आपल्या नातवाईकांसह मंगळवारी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ट्रेन ने आपल्या गावावरून  परतले ते कल्याण रेल्वे स्टेशनला उतरल्या नंतर त्यांनी रिक्षा पकडण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँड गाठले .त्या ठिकाणी असलेल्या सद्दाम नावाच्या रिक्षा चालकाला त्यांनी पत्रिपुल  ला जाण्यासाठी भाडे विचारले असता त्याने 60 रुपये सांगितले मात्र रिंकू याने 50 रुपये सांगताच या दोघा मध्ये वाद झाला या वादातून सद्दाम ,साकीब व त्याचा साथीदार मोइन यांनी रिंकू याना मारहाण केली .त्यानंतर रिंकु यांनी दुसरी रिक्षा करत घर गाठले व सद्दाम ,साकीब व त्याचा साथीदार मोइन यांनी त्यांच्या घरावर दगडफेक करत रिंकू व त्याच्या नातवाईकाना  मारहाण केली.या हल्ल्यात रिंकू सह त्याचे नातवाईक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .तर या प्रकरणी रिंकू यांनी काल महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारि नुसार पोलिसांनि सद्दाम शेख,मोहम्मद मुनावर अली खान,मोहन,जावेद खान,व अन्य एका साथीदारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email