रिक्षाचालकाने प्रवाशाला लुबाडले – कल्याण मधील घटना
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०८ – धुळे येथे राहणारे यतीन चौधरी हे २८ जून रोजी कल्याण मध्ये आले होते. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कल्याण बस स्थानकाबाहेर तळोजा एमआयडीसी येथे जाण्यासाठी रिक्षच्या प्रतीक्षेत होते. यावेळी एक रिक्षा चालक त्या ठिकानी आला मि सोडतो असे सांगत त्यांना रिक्षात बसवले या रिक्षात अजून दोन जण बसले होते व या रिक्षा चालकने तळोजा एम आय डी सी परिसरात निर्जनस्थळी नेत रिक्षा चालकासह त्याच्या दोन साथीदाराणी चौधरी यांना मारहाण करत चाकुचा धाक दाखवत एक मशीन,सोन्याचे दागिने ,मोबाईल असा मिळून एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेत तेथून पळ काढला. या प्रकरणी चौधरी यांनी शुक्रवारी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी तीन अज्ञात इसमा विरोधात गुन्हा नोंद करत त्यांचा शोध सुरु केला आहे.