राष्ट्रीय शिक्षण संस्थेला “डोंबिवली सेवा पुरस्कार” जाहीर

 डोंबिवली सेवा पुरस्काराचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

यंदाचा “डोंबिवली सेवा पुरस्कार”राष्ट्रीय शिक्षण संस्थेला

डोंबिवली : सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीस टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्रतिवर्षी डोंबिवली सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. परंतु या वर्षी प्रथमच एका संस्थेस हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या वर्षी डोंबिवली सेवा पुरस्काराचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या वर्षी पुरस्कारासाठी एका संस्थेची निवड होते ही विशेष बाबा आहे.

सदर पुरस्कार सोहळा रविवार दि. 29 एप्रिल 2018 रोजी टिळकनगर शाळेच्या भव्य पटांगणात सायंकाळी 6.00 वाजता होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत सहकार्यवाह विठ्ठल कांबळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये 11 हजार, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना 1968 रोजी झाली असून शहरातील एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक अशा एकुण 6 शाळा असून एक रात्रकालीन पदवी महाविद्यालय आहे. शिवाय कसाऱ्याजवळीळ दुर्गम भागात आश्रम शाळाही आहे. संस्था शहरी आणि ग्रामीण ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. सदर पुरस्कार सोहळ्यास डोंबिवलीकरांनी उपस्थित राहावे अशी विनंती मंडळाचे कार्यवाह डॉ. महेश ठाकूर यांनी केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email