राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत डोंबिवलीतील साक्षी परबची निवड

(श्रीराम कांदु)

डोंबिवली, दि. २० – डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी येथे राहणारी साक्षी परब हिची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत  निवड करण्यात आली आहे. यश जिमखाना येथे साक्षी प्रशिक्षक विलास माने यांच्याकडे जलतरणाचे धडे घेत आहे. बेलापूर, ठाणे, कल्याण,पवई, डोंबिवली, नवी मुंबई आणि गोवा येथे सागरी जलतरण स्पर्धेत दोन सुवर्ण पदक, १ रोप्य पदक मिळवले आहे.

हेही वाचा :-‘लिटील हार्बर’ या स्लोवाकियन चित्रपटाने युरोपीयन चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ

       नुकतेच कल्याण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने पार पडलेल्या राज्य स्तरीय जलतरण स्पर्धेत साक्षीने ५० मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्ण पदक (प्रथम क्रमांक), ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रोप्य पदक ( प्रथक क्रमांक ) असे दोन पदके  मिळवली आहे. राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी  साक्षी परबची निवड झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.हि  स्पर्धा कुठे होणार आहे आणि तारीख जून महिन्याच्या अखेरीस सांगण्यात येणार आहे. यश जिमखान्याचे मालक राजू वडनेकर, व्यवस्थापक मनोज सापरा,अनघा पतंगे, शिवाजी, रवी नेवले यांनी साक्षीला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :-चतुरंग ‘मुक्तसंध्या’मध्ये 24 तारखेला “मी अश्वत्थामा …चिरंजीव अभिवाचन”

Leave a Reply

Your email address will not be published.