राष्ट्रीय जंत नाशक दिनानिमित्त विशेष मोहिम

(श्रीराम कांदु)

कल्याण –१० व १५ फेब्रुवारी रोजी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने राष्ट्रीय जंत नाशक दिनानिमित्त एक विशेष मोहिम राबवली जाणार आहे.या मोहिमेंतर्गत शाळा तसेच आरोग्य केंद्रे येथे १ ते १९ या वयोगटातील बालकांना जंत विरोधी गोळी दिली जाणार आहे.सकाळी १० ते दुपारी ४ या दरम्यान ही मोहिम होणार असून पालकांनी आपल्या पाल्यांना ही गोळी अवश्य द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मातीच्या माध्यमातून आतडयात कृमि होतात,थकवा,अशक्तपणा तसेच रक्तक्षय व कुपोषण असे याचे दुष्परिणाम दिसून येतात.या दुष्परिणामामुळे त्यांच्या शाळेत सुट्या होतात.तसेच त्यांची शारीरिक व बौदधिक वाढ खुंटते.यावर उपाय म्हणून ही मोहिम राबवली जात आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email