राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेच्या माजलगाव शहर उपाध्यक्षावर तलवारीने प्राणघातक हल्ला

(म.विजय)

माजलगाव दि.०५ – किरकोळ राजकीय वादातून चौघा जणांनी राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे माजलगाव शहर उपाध्यक्ष मिर्झा अरबाज मिर्झा मुर्तुज बेग आणि त्यांच्या मित्रावर तलवार आणि लोखंडी रॉडच्या साह्याने प्राणघातक हल्ला केला.

हि घटना शहरातील कोर्ट रोडवर घडली. या हल्ल्यात मिर्झा अरबाज हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी मिर्झा अरबाज (रा. गांधनपुरा, माजलगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे कि, रात्री ८ वाजताच्या सुमारास आंबेडकर चौकातील त्यांचे कपड्याचे दुकान बंद करून ते शेख मुजीब शेख कलीम या मित्रासोबत मोटारसायकलवरून घराकडे निघाले होते. ८.१५ वाजताच्या सुमारास ते कोर्ट रोडवर आधार बँकेसमोर असताना त्यांच्या शेजारच्या गल्लीतील अक्षय मेंडके, शुभम साबळे आणि अन्य दोघांनी त्यांना अडविले. ‘मोठा नेता झालास का’ असे म्हणत त्या चौघांनी मिर्झा अरबाज यांच्यावर तलवार आणि लोखंडी रॉडच्या साह्याने हल्ला चढविला. यावेळी शेख मुजीब याच्या डोक्यावरही वार करण्यात आला.

या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले. आजूबाजूचे लोक मदतीला धावून आल्याने नंतर हल्लेखोर पळून गेले. जमा झालेल्या लोकांनी मिर्झा अरबाज आणि शेख मुजीब यांना रुग्णालयात दाखल केले.

सदर फिर्यादीवरून अक्षय मेंडके, शुभम साबळे आणि अन्य दोघांवर कलम ३०७, ३४ आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email