राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हल्लाबोल आंदोलन
(जय दूबे)
गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर आलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णतः अपयशी ठरले आहे.नुसती पोकळ आश्वासने देऊन राज्याच्या जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार,व्यापारी,शिक्षक,डाॕक्टर, महिला वर्ग,विद्यार्थी,जेष्ठ नागरिक, दिव्यांग, ग्राहक अशा सर्वच घटकांमध्ये या सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केंद्रातील सरकारच्या नोटबंदी व जी.एस.टी.निर्णयामुळे राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढीमुळे महागाईचा भस्मासुर माजला असून सामान्य जनता हवालदिल झाली आहे. राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय न घेता सरकार नुसती फसवी जाहिरातबाजी करत आहे.
या राज्य सरकारच्या अनागोंदी आणि जन विरोधी कारभाराचा निषेध म्हणून बुधवार दि. 29/11/2017 रोजी सकाळी 11 वा. शंकरराव चौक, कल्याण-डोंबिवली महापालीका मुख्यालया समोर,कल्याण (प.) येथून मोर्चाने शिवाजी चौक-महम्मदअली चौक-नेहरु चौक-स्टेशन रोड मार्गे कल्याण तहसिल कार्यालय पर्यंत हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
सदर आंदोलन जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.सदर आंदोलनाला माजी पालकमंत्री व जिल्हाप्रभारी मा.गणेश नाईक प्रदेश उपाध्यक्ष *मा.प्रमोद हिंदूराव,प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार मा.संजीव नाईक,माजी मंत्री मा.जितेंद्र आव्हाड, प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा निरिक्षक मा.रविंद्र पवार,आमदार मा.जगन्नाथ शिंदे,आमदार मा.निरंजन डावखरे आणि माजी खासदार मा.आनंद परांजपे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.