राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सायकल आणि बैलगाडी मोर्चा
(म.विजय)
ठाणे – केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प गरीबांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांवर घाव घालणारा आहे. पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या किंमती वाढविल्यान दूध, भाज्या यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. इंधनावर सेस टॅक्स वाढविल्याने त्याचा परिणाम गरिबांच्या अन्नावर झाला आहे. हा अर्थसंकल्प देशातील शेतकरी, मजूर, लहान व्यापारी, माध्यमवर्गीयांवर अन्याय करणारा आहे. याचाच अर्थ भाजप सरकार गरिबांच्या विरोधातील सरकार आहे. असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सायकल आणि बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकर्यांनी चक्क चूल पेटवून त्यावर अन्न शिजवले. दरम्यान, जपान, चिनसारखे देश त्यांच्या मुलांना उच्च शिक्षित करून देशाचा विकास घडवीत आहेत, तर या देशाचे राज्यकर्ते देशातील मुलांच्या हातात जातीय द्वेषाचे विष देऊन देशाला बरबाद करत आहेत, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंब्रा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. केंद्राने नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्या अर्थसंकल्पाला गरिबांच्या आणि देशाच्या विरोधातील अर्थसंकल्प मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंब्रा तहसीलदार कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून आणि चुलीवर स्वयंपाक बनवून केंद्राचा निषेध केला. कौसा ते तहसीलदार कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. हा निषेध मोर्चा मुंब्रा येथील जैन मंदीराच्या पटांगणात विसर्जित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाचे आयोजन कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान आणि युवक अध्यक्ष शानु पठाण यांनी केले होते. हा निषेध मोर्चा विसर्जित झालेल्या पटांगणात एक सभा घेण्यात आली. यावेळी डॉ. आव्हाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हे सरकार देश आणि गरिबांच्या विरोधातील आहेच, पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील व्यापारी, कारखानदार वर्गही देशोधडीला लागत आहे. आई वडिलांनी मोठ्या कष्टाने मुला मुलींना शिक्षण देऊन उच्च शिक्षित केले आहे. मात्र या मुलांसमोरचे भविष्य अंधकारमय झाले आहे. देशाचे पंतप्रधान अशा मुलांना पकोडे विकायला सांगत आहेत. रस्त्यावर हातगाड्या लावून पकोडे विकण्यासाठीच आम्ही मुलांना शिक्षित केले आहे का? असा सवाल उपस्थित करीत आमदार आव्हाड यांनी मोदी यांच्या चुकीच्या धोरणांचा निषेध केला. तर राज्याचे सरकार चालविणार्या फडणवीस सरकारचा समाचारही घेतला. देशात आणि राज्यात जातीय द्वेष पसरवणारे काम केले जात आहे. विरोधकांची पोलिसांच्या बळावर मुस्कटदाबी केली जात आहे. या देशातील सीबीआय, ईडीसारख्या सर्वोच्च तपास यंत्रणेला गल्लीबोळात पाळीव प्राण्यांसारखे पळविले जात आहे. विरोधकांवर जरब बसावी म्हणून भुजबळ यांच्यासारख्यांना कारागृहाच्या बाहेर येऊ दिले जात नाही. केवळ मुस्लिम द्वेषापोटी गोवंश हत्या बंदीचा कायदा आणला गेला आहे. हे सरकार सत्तेवर येताच देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाला आहे. लोकशाहिची घसरण झाली आहे. देशात फॅसिस्टवाद आणि जातीयवाद बोकाळलेला आहे. हिंदू मुस्लिम, दलित मराठा अशा दंगली घडवून आणल्या जात आहेत, असे आरोपही आमदार आव्हाड यांनी केले.
आ.जितेंद्र आव्हाड आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे, कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान, युवक अध्यक्ष शानु पठाण यांनी पटांगणात चुलीवर बनविण्यात आलेले अन्न भक्षण केले. या मोर्चामध्ये नगरसेवक सिराज डोंगरे, ऱाजन किणे, अजीज शेख बाटा, अशरीन राऊत, अनीता किणे, जफर नुमानी, हाफ़िजा नाइक, मोरेस्वर किणे, सुनीता सातपुते, हिरा पाटिल, फरजाना शाकिर, नादिरा सुर्मे, बाबाजी पाटिल, जमीला नासीर शेख, रूपाली गोटे आणि राकांपा पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मुंब्रा भागातील सामान्य नागरिकही या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सामील झाल होते.
राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेस ठाणे अध्यक्षा करिना दयालानी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष अभिजीत पवार, डॉ. मुमताज शाह, इम्मतियाज खान उर्दू, शोयब खान, संगीता पालेकर, रिहान पीतलवाला, जावेद शेख मेडिकल, बबलू शेमना, मेहफुज शेख मामा, इब्राराहिम राऊत, मुन्ना साहिल, साकिब दाते, शाकिर शेख, मेहसर शेख, शुफियान खान, गुडू वसीम, सोनू हाशमी, सादिक शेख, मौलाना अजहर सिद्धिकी, यूसूफ खान, बाबा सरकार, इमरान सुर्मे,शाहरूख सैयद, शोहल बुरहान, नईम पंगारकर, इम्मतियाज बनू, रफीक शेख, इमरान हकीम, मयूर सांरग, शब्बीर लोखंडवाला, एजाज शेख, शहनवाज खान, आसीफ शेख, सलीम सैयद, जमील मिर्जा, समीर मलिक, मरजान मलिक, पुजा खान, नूर जहां आपा, अफताब बब्बू, यूनूस शेख, आसिक गर्दी, हाजी मोमिन, आवेश, कासीम अली फकीर, जुबैर भाई, हयात खान, शमशाद भाई, हाजी इसहाक, करन, करीम आदींसह शहरात सर्व कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.