राष्ट्रवादी काँग्रेसचा दणका,मुंब्रा बायपासचा कायापालट होणार – आमदार जितेंद्र आव्हाड

 

१५ डिसेंबरपासून नूतनीकरणास सुरूवात

रेल्वेवरील पुलाचे मजबुतीकरण करणार

डोंगराकडील आणि नागरी वस्तीकडील भागात संरक्षक कठडे उभारणार

अमित गार्डनसमोरील रस्ताही नव्याने बांधणार

(म विजय )

राष्ट्रवादी काँग्रेसने पनवेलच्या पीडब्ल्यूडी कार्यालयावर काढलेल्या मोर्चामुळे बांधकाम खाते वरमले आहे. मुंब्रा बायपासची दुरूस्ती, रेल्वे वरील पुलाचे मजबूत तसेच संरक्षक कठडे उभारण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या सहीचे लेखी पत्र अधीक्षक अभियंता राहुल मोरे यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांना दिले
मुंब्र्याच्या जवळून डोंगराच्या कडेने गेलेला मुंब्रा बायपास या नावाने ओळखला जाणारा रस्ता आता मृत्युचा सापळा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या संदर्भात आ. आव्हाड यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीनंतर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निवासस्थानी बैठक बोलावून मुंब्रा बायपासचे उर्वरित काॅक्रीटीकरणाचे काम आणि इतर कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. कार्यकारी अभियंता केडगे यांना यावेळी फोनवरून सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने आजचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने मोरे यांनी आज लेखी पत्र दिले आहे. त्यानुसार बायपासचे काम 15 डिसेंबरपासूनच सुरू करण्यात येणार आहे. तसेच जून 2018 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अभियंता केडगे यांच्याशी फोनद्वारे केलेल्या चर्चेनुसार मुंब्रा बायपास पूर्ण काँकीटीकरण करण्यात येईल. कार्यकारी अभियंता मोरे यांनी मुंब्रा बायपास येथील रस्त्याच्या डांबरीकरण, मजबुतीकरण, सुरक्षा भिंत बांधणे, रस्त्यामधील खड्डे भरणे,डोंगराच्या बाजूने पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी गटर बांधणे तसेच ही कामे सुरू असतेवेळी रोडवरील सर्व अवजड वाहनांची वाहतूक पूर्ण बंद करण्यात येईल;
कळवा मुब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खानआणि युवा नगरसेवक अशरफ शानू पठाण यांच्या पुढाकाराने आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली
या मोर्चात , ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक सिराज डोंगरे, राजन किणे, जफर नोमानी, मोरेश्वर किणे,बाबाजी पाटील, नगरसेविका आशरीन राऊत, अनिता किणे,हफीजा नाईक, हसीना अजीज शेख, साजिया परविन अंसारी, सुलोचना हिरा पाटील, नादीरा यासीन सुरमे, सुनिता सातपुते, रूपाली गोटे, फरजाना शाकिर शेख, जमीला नासीर खान, मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष ब्बलु शेमना, कौसा ब्लॉक अध्यक्ष जावेद शेख मेडीकल, शिळ ब्लॉक अध्यक्ष मेहफूज शेख मामा, युवा अध्यक्ष कौसा ब्लॉक अध्यक्ष मैहसर शेख, शाकिर शेख कौसा कार्यध्यक्ष साकीब दाते, रेहान पितळवला, नासिर 10 10, संगीता पालेकर, पूजा उदासी, विदय़ार्थी सेल ठाणे शहऱ अध्यक्ष शाहरूख सैय्यद, मुंब्रा कळवा विदय़ार्थी सेल अध्यक्ष इम्रान हकीम, मरजन मल्लीक, ठाणे जिल्हा अध्यक्ष दिव्यांग विभाग मोहम्मद यूसुफ खान, युवा, महीला सेल, वियार्थी सेल, अल्पसंख्यांक विभाग, दिव्यांग विभागाचे पदाधिकारी आणि  कार्यकर्ते व  मुंब्रा शहर जागरूक रहिवाशी या मोर्चात सहभागी झाले होते

यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. आव्हाड यांनी, मी 2009 ला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मुंब्रा बायपासच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण केले होते. आमची मागणी हीच होती की या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमची मागणी मान्य केली आहे
त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी या कामाला मंजुरी देऊन शहराच्या विकासाला हातभार लावला आहे.
मुंब्रा बायपासवर अवजड वाहनांची गर्दी मोठी आहे. इतर दोन मार्गावर टोल आकारला जात असल्याने इथे गर्दी वाढत आहे. त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांना टोल आकारावा, अशी मागणी आ. आव्हाड यांनी केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email