रायबरेली, गोरखपूर, भटिंडा, गुवाहाटी, बिलासपूर आणि देवघर येथे नवीन एम्ससाठी संचालक पदाची एक जागा स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
नवी दिल्ली, दि.२४ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने रायबरेली(उत्तरप्रदेश), गोरखपूर(उत्तरप्रदेश), भटिंडा(पंजाब), गुवाहाटी(आसाम), बिलासपूर(हिमाचल प्रदेश) आणि देवघर(झारखंड) येथील नवीन एम्ससाठी संचालक पदाची एक जागा स्थापन करायला मंजूरी दिली आहे. या पदासाठीचे मूळ वेतन 2,25,000/- (निश्चित) अधिक एनपीए परंतु 2,37,500/- पेक्षा जास्त असणार नाही. संचालक हे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आणि संस्थेच्या एकूण प्रशासनाचे प्रभारी असतील आणि संस्थेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामे वितरित करतील.
Please follow and like us: